कुक्कू !

– मीडिया वॉच दिवाळी अंक -२०१८

-माणिक मुंढे
………………….

आपण समाज म्हणून प्रचंड दांभिक आहोत. दांभिकतेचं ऑलंपिक भरवलं तर आपण गोल्ड मिळवू. आपल्याकडे मैथूनांची खजुराहोसारखी मंदीरं उभी आहेत. आणि दुसऱ्या बाजुला मात्र लस्ट स्टोरीजमध्ये कियरा अडवाणीच्या टॉयसेक्सच्या प्रसंगाला कभी खुशी, कभी गम असा बॅकग्राऊंड स्कोर वापरला म्हणून लता मंगेशकर नाराज होतात. आपल्याकडं सगळं फार गांभीर्यानं घेतलं जातं. तोंड पाडून बसल्याशिवाय विचारवंत वाटत नाही. हसणारा, हसवणारा आपल्याला उच्च बुद्धीमत्तेचा माणूसच वाटत नाही. त्याच्याकडे उथळपणे पाहिलं जातं. लताबाईंनीही लस्ट स्टोरीजमधला तो प्रसंग पाहुन मनमुराद हसून घ्यायला पाहिजे होतं. नाराजी ऐवजी करण जोहरचं कौतूक करायला हवं होतं. पण झालं उलटं त्यांनी नाराजी व्यक्त केली. म्हणालो ना पुरूषानं बाईबद्दल जपलेल्या प्रतिमेपेक्षाही बाईनं बाईबद्दल जपलेल्या प्रतिमा जास्त हानीकारक आहेत. पण हा तोच करण जोहर आहे जो सार्वजनिकपणे बकचोदीचे कार्यक्रम करतो. त्याला लोक हजारो रूपयांचं तिकिट लावून जातात. स्वत: गे असल्याचं तो दवंडी पिटवतो. हे सगळे चालतं. त्याच्या सिनेमातले गाणे चालतात. त्याचा पैसा चालतो पण लस्ट स्टोरीजमध्ये संस्कारी गाणं नाही चालत?

‘वीरे दी वेडींग’मध्ये स्वरा भास्कर हस्तमैथून (खरं तर ती टॉय सेक्स करत असते) करताना तिचा नवरा रेडहँड पकडतो आणि नंतर घटस्फोट देतो. ज्या काळात पोरं पोरी व्हॉटसअप किंवा व्हीडीओ सेक्स करतायत त्याकाळात टॉयसेक्समुळे घटस्फोट होणं पटत नाही. उलट नवरा ‘चरमसुख’साठी खेळणी घेत नाही म्हणून घटस्फोट हवाय म्हणणाऱ्या बायका तुम्हाला मुंबई हायकोर्टात दिसल्या नाहीत म्हणजे मिळवलं. सेक्स टॉईज ऑनलाईन मागवण्यात आपली मुंबई, दिल्ली, गुडगावच्या पुढं म्हणजे टॉपवर आहे. आपल्या संस्कारी देशात सेक्स टॉयचं मार्केट जवळपास सव्वा दोनशे मिलियन डॉलरच्या आसपास आहे. त्यातही पुणे, बडोद्यासारख्या टू टायर शहरांमध्ये सेक्स टॉईज ऑर्डर करणाऱ्यांमध्ये महिला आघाडीवर आहेत. संस्कारी समाज म्हणून जगभर ढोल वाजवत फिरणाऱ्या गुजरात्यांचं अहमदाबाद ‘खेळणी’ वापरण्यात दुसऱ्या नंबरवर आहे. तेही सार्वजनिकरीत्या बंदी असताना. खरोखरच जर स्वरा भास्करचाच नियम पुरूषांना लावायचा ठरला तर लग्न झालेल्याचा आठवड्यातून एक दोन वेळेस तरी घटस्फोट होईल आणि न लग्न झालेल्या पोरांचा रोज.
हस्तमैथून न करणारा पुरूष शोधूनही सापडणार नाही आणि सापडलाच तर तो पुरूष असण्याची शक्यता नाही. मग असं असतानाही हस्तमैथून करते म्हणून बाईला घटस्फोट कसा काय दिला जाऊ शकतो? अर्थातच त्याला कारणं आहेत बाईनं बाईबद्दल आणि समाजानं किंवा पुरूषानं बाईबद्दल जपलेल्या वर्षानुवर्षाच्या प्रतिमा. त्या प्रतिमा आता कुठं गळून पडतायत असं दिसतंय. त्याला कारणीभूत ठरतायत ती रोज नव्यानं बाजारात येणारी माध्यमं आणि नवं तंत्रज्ञान.
अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानेनं सॅक्रेड गेम्स ह्या वेब सीरीजमध्ये हिरोईन म्हणून ‘कुक्कू’ उभी केलीय. ‘जिसकी कुक्कू उसकी मुंबई’ प्रत्येकाला ही कुक्कू हवीय. केवढी भन्नाट दाखवलीय ती. पुरूषांच्या सगळ्या लालसा ती जीवंत करते. पण तुम्हाला माहितीय, ती संपता संपता कळते की ‘कुक्कू’ बाई नाही हिजडा आहे. एकेदिवशी लोकलच्या दारात उभं राहून कॉलेजची दोन पोरं सॅक्रेड गेम्सची चर्चा करत होते. त्यातला एक म्हणाला, अपने को ना कुक्कूही चाहीए बेटा, ये लडकी लोग बहोत मिलता है, दे टाळी !
आपण समाज म्हणून प्रचंड दांभिक आहोत. दांभिकतेचं ऑलंपिक भरवलं तर आपण गोल्ड मिळवू. आपल्याकडे मैथूनांची खजुराहोसारखी मंदीरं उभी आहेत. आणि दुसऱ्या बाजुला मात्र लस्ट स्टोरीजमध्ये कियरा अडवाणीच्या टॉयसेक्सच्या प्रसंगाला कभी खुशी, कभी गम असा बॅकग्राऊंड स्कोर वापरला म्हणून लता मंगेशकर नाराज होतात. आपल्याकडं सगळं फार गांभीर्यानं घेतलं जातं. तोंड पाडून बसल्याशिवाय विचारवंत वाटत नाही. हसणारा, हसवणारा आपल्याला उच्च बुद्धीमत्तेचा माणूसच वाटत नाही. त्याच्याकडे उथळपणे पाहिलं जातं. लताबाईंनीही लस्ट स्टोरीजमधला तो प्रसंग पाहुन मनमुराद हसून घ्यायला पाहिजे होतं. नाराजी ऐवजी करण जोहरचं कौतूक करायला हवं होतं. पण झालं उलटं त्यांनी नाराजी व्यक्त केली. म्हणालो ना पुरूषानं बाईबद्दल जपलेल्या प्रतिमेपेक्षाही बाईनं बाईबद्दल जपलेल्या प्रतिमा जास्त हानीकारक आहेत. पण हा तोच करण जोहर आहे जो सार्वजनिकपणे बकचोदीचे कार्यक्रम करतो. त्याला लोक हजारो रूपयांचं तिकिट लावून जातात. स्वत: गे असल्याचं तो दवंडी पिटवतो. हे सगळे चालतं. त्याच्या सिनेमातले गाणे चालतात. त्याचा पैसा चालतो पण लस्ट स्टोरीजमध्ये संस्कारी गाणं नाही चालत?
पण काही काही कुणासाठी थांबत नाही. जगज्जेत्या सिकंदरसाठी नाही थांबला तर बाकीच्यांचं काय? ईटीव्हीला आमच्याकडे नागपुरचा एक पोरगा होता. त्याच्या बोलण्यात हलकसं बायकीपण होतं. नंतर तो एबीपी माझा सुरु झाल्यावर एन्टरटेन्मेंट टीमला ज्वाईन झाला. काही दिवस राहीला नंतर सोडलं ते गायबच झाला. काही वर्षानंतर अचानक तो समलैंगिकांच्या मुंबईतल्या मोर्चाचं नेतृत्व करताना दिसला. पूर्ण बदलून गेला. पाहुणा म्हणून चर्चेसाठी तो पुन्हा न्यूजरूमला आला तर त्याच्यावर विश्वासच बसत नव्हता. तो स्वत:च्या बॉयफ्रेंडबद्दल इतका बोलत होता की आम्हा न्यूजरूममधल्यांना वाटत होतं की आपण आपल्या ना प्रेयसीबद्दल एवढं बोलतो ना प्रियकराबद्दल. पोरींचे चेहरे तर बघण्यासारखे होते. नंतर कुठल्या तरी फ्रेंच डॉक्युमेंट्रीवाल्यानं त्याच्यावर फिल्म बनवली. एकेदिवशी नेटवर मी त्याला जगप्रसिद्ध गायिका बियॉन्ससोबत रेडकार्पेटवर पाहिलं. तो भेटला त्याच वेळेस त्याच्या बॉयफ्रेंडला भेटायला त्याचे नागपुरहून मराठमोळे आईवडील येणार होते. त्यामुळे खुश होता. मुद्दा एवढाच की काळ पुढे सरकतोय तसं बदल घडतायतच.
दुसरा एक असाच मित्र आहे. एका बड्या राजकारण्याचा मुलगा. मोठ्या हुद्दायवर काम करतो. दिसतो असा की फेसबुकवर अनेक जणी त्याच्यावर फिदा असल्याचं दिसतंच. पण कुणालाच त्याचं वास्तव माहित नाही. तो गे आहे. पाठीमागे एकेदिवशी भेटला तर म्हणाला युरोपातल्या कुठल्या तरी देशात सेटल व्हायचं बघतोय. तिकडं थोडीशी तरी मोकळीक आहे. ह्या देशात काही मला लोकं लग्न करू देणार नाहीत आणि मला तर आठवड्याभराची हळद लावायचीय. मलाही वाटलं, खरंच आहे जो देश आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करत नाही तो सोडलाच पाहिजे. सेक्सबद्दल बंडखोरी करणाऱ्या नायिका अलिकडे अनेक फिल्मस् आणि वेबसीरीजच्या केंद्रस्थानी आहेत. अगोदरही त्या असायच्या पण आता त्याला मिळणारी मान्यता जास्त आहे. तसं नसतं तर लस्ट स्टोरीज पहाण्यासाठी नेटफ्लिक्सवर लोकांनी उड्या नसत्या मारल्या. पण यातही थोडासा घोळ असल्याचं दिसतं. म्हणजे काही तरी आयुष्यात कमी आहे म्हणून कुणी तरी आडवळणाचं वळण निवडताना नायिकांना दाखवलं जातंय. म्हणजे नेहा धूपिया सेक्स टॉय वापरते, का तर तिला नवरा नसतो. कियरा अडवाणी टॉयसेक्स करते का तर तिचा नवरा असूनही ‘चरमसूख’ मिळवण्यात तो तिला सहभागीच करून घेत नाही. कामावरून येतो , ओरबाडतो आणि स्वत:च्या मर्दुमकीवर खुश होऊन झोपी जातो. मनिषा कोईराला नवऱ्याच्याच मित्रासोबत आनंद घेत रहाते का तर नवरा कायम धंद्यात अडकलेला असतो किंवा तो आपल्याकडच्या टीपीकल पुरूषांसारखा विचार करत असतो. म्हणजे काही तरी कारण दाखवलं जातं. पण असं का नाही की, मला वाटतं म्हणून मी हे करतेय? थ्रील, मजा, उथळ थोडीच असते? आपल्याला प्रत्येक कृतीला तात्विक आधार का लागतो ?
माझी एक मैत्रिण आहे, लग्न केलं, मुलगी झाली नंतर लग्नातून बाहेर पडली, आता एकटी रहाते, फिरते, मित्र वगैरे आहेत. जवळचा मित्रही आहे. तो काही काळानंतर बदलत जातो. भरपूर फिरते. तिला हवं तसं ती जगते. कुठल्याही क्रांतीचा तिच्यात आविर्भाव नसतो आणि का असावा? तिच एकदा म्हणाली, माझ्या नवऱ्याला माझे लेस्बियन संबंध चालतील म्हणतो पण अफेअर नाही. म्हणजे मला जे करायचंय ते नाही आणि जे मी नाहीच ते मी का करू? तिचा सवाल.
निदा फाजलींच्या ओळी बघा.
वो किसी एक मर्द के साथ ज्यादा दिन नही रह सकती,
यह कमजोरी नही, सच्चाई है,
लेकिन जितने दिन ओ जिसके साथ रहती है,
उसके साथ बेवफाई नही करती,
उसे लोग भलेही कुछ कहे मगर,
किसी एक घर में जिंदगी भर झूठ बोलने से अलग अलग मकानों मे
सच्चाईंयां बिखेरना ज्यादा बेहत्तर है.
अर्थातच निदांच्या ओळी सुंदरच आहेत पण इथेही ‘वफादारी’ अपेक्षीत आहे. तीही बाईकडूनच का? माझ्यादृष्टीनं स्त्री पुरूष संबंधात निष्ठेला नको तितकं महत्व दिलंय. पाच नवरे असणाऱ्या द्रोपदीची निष्ठा तुम्ही कशी पुजणार? ज्या काळात लोकं थ्री सम, फोर सम अनुभवतायत त्या काळातली निष्ठा कशी ठरवणार ? लस्ट स्टोरीजमध्ये मनिषा कोईराला शेवटी नवऱ्याला खरं खरं सांगते. तोही तिला तुझं जे काही चाललंय ते चालू दे फक्त मला माहित असल्याचं त्याला कळू देऊ नको असं सांगतो, हे सध्याचं लग्न झालेल्या कित्येकांचं वास्तव आहे हे कसं नाकारता येईल? वय, वेळ, काळानुसार मानवी स्वभाव, संबंध सगळं बदलतात, भूक ही माणसाच्या विविध बदलांच्या मुळाशी आहे. योजना यादवच्या कवितेतल्या काही ओळी बघा.
घटत्या सीमान्त उपयोगितेचा सिद्धान्त
माहितीय तुला? तोच मार्शलचा : डीमिनीशिंग मार्जीनल युटिलिटी
ज्याच्यात खूप भूकेले असताना
एक पाव खाल्ला की गरज वाढते दुसऱ्याची
दुसरा खाल्ला की तिसऱ्याची
भूक असेपर्यंत चढता असतो आलेख
भूक संपली की शमते गरज पावाची
एका क्षणी नकारात्मकही होते ती
ही भूकच सगळ्या बदलांच्या मुळाशी आहे. त्याच लस्ट स्टोरीज आहेत. सध्या टॉयसेक्सवरून छोटीमोठी वादळं उठतायत पण वास्तवात ही सध्याची पिढी ही त्याच्याही किती तरी पुढं गेलीय. फोनोसेक्स किंवा व्हिडीओ सेक्सही आता नॉर्मल होऊ पहातोय. त्याच्या स्टोरीज आल्या तर नैतिकतेच्या आणखी किती झुली फेकून द्याव्या लागतील ? घरंदाज बायकांनो तुमची शांतीत क्रांती चालू द्या..!

(लेखक टीव्ही ९ या वृत्त वाहिनीत वृत्त संपादक आहेत)

9833926704

[email protected]

Previous articleपळसाचं चौथं पान !
Next article‘त्यांचं’ आणि कुणाचंच ‘सेम’ नव्हतं…!!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.